Yojna Varta

नमो शेतकरी योजना 2024 – Namo Shetkari Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो आपले योजना वार्ता या मराठी वेबसाईटमध्ये स्वागत आहे . तुम्हाला तर माहित आहे की आपल्या देशात जास्तीत जास्त लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. म्हणून भारताला कृषिप्रधान देश म्हणतात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. सरकार नेहमी शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी प्रयत्नशील असते. 

आज आपण सरकारच्या आशाच एका शेतकऱ्या साठीच्या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्या योजनेचे नाव नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. यालाच नमो शेतकरी योजना 2024 म्हणतात. Namo Shetkari Yojana नेमकी काय आहे , त्याची पात्रता काय आहे.

अर्ज कसा करायचा या सर्व घटकांची माहिती आपण आज या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत ,त्यासाठी  तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कंमेंट (Comment) करून सांगा . ते सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

नमो शेतकरी योजना 2024 – Namo Shetkari Yojana 2024

नमो शेतकरी योजना 2024 : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबविण्यात आली आहे. तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठीच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनांतर्गत राज्यस्तरावर नमो शेतकरी योजना राबविण्यात आली आहे. 

नमो शेतकरी सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रतिवर्षी 6000 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे नमो शेतकरी योजना राबविली जाते तर केंद्र सरकारद्वारे प्रधान मंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना राबविली जाते.

या योजनेअंतर्गतही शेतकऱ्याला प्रतिवर्षी 6000 रुपये मिळतात. हि रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. म्हणजे चार महिन्याला 2000 हजार रुपये मिळणार. तसेच ( prdhanmantri kisan samman nidhi yojana ) प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे 6000 हजार रुपये मिळणार आहेत.

अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000 रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने 1792 कोटीच्या वितरणास मंजुरी दिली आहे.

बालिका समृद्धी योजनेच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा .

बालिका समृद्धी योजना 2024 – Balika Samridhi Yojana Maharashtra

नमो शेतकरी योजनेचा उद्देश – Namo Shetkari  Yojana Purpose 

राज्यातील शेतकऱ्यांनी पैशाअभावी शेती पडीक न ठेवता त्यांना शेतीसाठी लागणारे बी बियाणे, खत, कीटकनाशके यांची खरेदी करता यावी हा नमो शेतकरी योजनेचा मखय उद्देश आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत कारण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.हे नमो शेतकरी महा सम्मान योजनेचा उद्देश आहे.  

नमो शेतकरी योजनेचे फायदे – Namo Shetkari  Yojana Benefits

राज्य सरकारद्वारे राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6000 रुपये आर्थिक  मदत होईल. 

नमो शेतकरी योजनेद्वारे मिळणारी रक्कम ही थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात D BT द्वारे जमा केली जाते. 

1.5 करोड शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळाला आहे. 

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला नमो शेतकरी सरकारी योजनेचा लाभ मिळेल. 

राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे एकुण 12000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत. 

नमो शेतकरी सरकारी योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. 

नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जास्त झाला आहे. 

नमो शेतकरी योजनेची पात्रता – Namo Shetkari  Yojana Eligibility

नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –  Namo Shetkari Yojana Documents

नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा – Namo Shetkari Yojana Application Process 

जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना सरकारच्या पी एम किसान सम्मान निधी योजनेचे अनुदान मिळत आहे असे शेतकरी कुटुंब नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना या साठी पात्र आहेत. 

नमो शेतकरी योजना  रेजिस्ट्रेशन Namo Shetkari Yojana Registration.

नमो शेतकरी योजनेसाठी  वेगळे रेजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेऊ शकता. यासाठी तुमचे पी एम किसान योजनेचे रेजिस्ट्रेशन केलेले असणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी – namo shetkari yojana beneficiary status list 

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर या दोन पर्यायांपैकी रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा.

कॅप्च सोडवून Go Gate यावर क्लिक करा. 

शेतकऱ्यांची यादी तपासायची असेल तर आपल्याला आपला जिल्हा गाव निवडायचे आहे. ती निवडल्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींना लाभ मिळाला आहे त्यांची एक यादी आपणांसमोर येईल त्यात आपले नाव तपासा.

नमो शेतकरी योजनेचे सर्वाधिक लाभार्थी – 

नमो शेतकरी योजनांचा सर्वात जास्त लाभ हा राज्यातील अहमदनगर , सोलापूर , कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात   103 करोड रुपयांचे वितरण झाले आहे. तर  सोलापूर 90 करोड 80 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात 81 करोड रुपयांचे वितरण झाले आहे. 

नमो शेतकरी योजना हप्ता – namo shetkari yojana installment 

नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात जमा केली जाईल . 

निष्कर्ष 

मित्रांनो अशाप्रकारे आपण आज नमो शेतकरी महा सम्मान योजन 2024 विषयी माहिती पाहिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राबविलेली ही योजना खरोखरच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. ज्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बिकट आहे आशा शेतकऱ्यांना  या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही त्याच्या आर्थिक अडचणीसाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. आतापर्यन्त या योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मिळवला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी नमो शेतकरी योजना ही महत्वपूर्ण आहे.पी एम किसान योजनेचे लाभार्थी हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवली गेली आहेत. त्यामळे या योजनेसाठी इगल अर्ज करण्याची गरज नाही. 

मित्रांनो आशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न  ( FAQ )

Exit mobile version