नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे योजना वार्ता या मराठी वेबसाईटमध्ये स्वागत आहे . केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मुलींच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजना राबवत असते. सरकारच्या आशा योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे हा आमच्या वेबसाईटचा मुख्य हेतू आहे. त्यामळे गरजु व्यक्तीना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे येथे त्यांना संपूर्ण माहिती मिळून जाईल.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रीकरणातून मुलींसाठी, त्याच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक बालिका समृद्धी योजना आहे .
आज आपण महाराष्ट्र शासनाच्या बालिका समृद्धी योजना 2024 या महत्वपूर्ण आशा योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहेत. या योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता , नियम या सर्व घटकांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे. आणि या योजनेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कंमेंट (comment ) करून नक्की सांगा .
बालिका समृद्धी योजना – Balika Samridhi Yojana In Marathi
बालिका समृद्धी योजना 2024 : भारत देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल जरी करत असला तरी आताही समाज मध्ये मुलगा-मुलगी हे भेद मानले जातात. मुलगा किंवा मुलगी एक समान आहेत हे जरी दाखवले जात असले तरी अनेक कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येणे हे एक प्रकारचे ओझे मानले जाते समाज मुलीच्या जन्माकडे एका मोठ्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहतो. यासाठीच भारत सरकारने मुलीच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ऑगस्ट 1997 मध्ये बालिका समृद्धी योजना अंमलात आणली. balika samridhi yojana ही केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे .
देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित राहावे आणि मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असते .Balika Samridhi Yojana Maharashtra योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यानंतर तिच्या कुटुंबियांना 500 रुपयाची आर्थिक मदत मिळते. यानंतर मुलीचे दहावी पर्यंतचे शिक्षण होईपर्यंत तिला शिक्षणासाठी मदत म्हणून काही रक्कम दिली जाते.ही रक्कम मुलींना शैक्षणीक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य करते. आणि त्यामळे मुली स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
बालिका समृद्धी योजनेचे उद्देश – Balika Samridhi Yojana Purpos
बालिका समृद्धी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश आहे .
मुलगा मुलगी असा भेद न करता मुली यासुद्धा कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे हा दृष्टिकोन निर्माण करून स्त्री भ्रूण हत्या कमी करणे .
या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्म दराचे प्रमाण वाढविणे.
या योजनेअंतर्गत मुलींना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे .
मुलींना त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दहावी पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.
बालिका समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये –
बालिका समृद्धी योजना अंतर्गत मुलगी 10 वर्ष किंवा त्याहून कमी वयाची असल्यास मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते.
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या खात्यामध्ये कमीत कमी 1000 रु ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये एका वर्षात 1.5 लाखापर्यंत रक्कम भारत येते.
मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी 50 % रक्कम काढता येते आणि उर्वरित रक्कम मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर मिळते.
मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा 18 वर्षांनंतर तिचे लग्न जमले तर तुम्ही ठेवलेली रक्कम तुम्हाला व्याजासहित परत मिळते.
बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यावर 500 रु आणि तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारतर्फे शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
या योजनेमुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म ऑगस्ट 1997 या वर्षी किंवा त्यानंतर झालेला असावा.
या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि ती तिच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
बालिका समृद्धी योजनेचे फायदे – Balika Samridhi Yojana Benefits
Balika Samridhi Yojana Maharashtra या योजनाअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेच तिच्या पालकाला 500 रुपयाची आर्थिक मदत मिळते.
मुलींना शिक्षण घेण्यासाठी पहिली पासून ते दहावी पर्यंत सरकार शिष्यवृत्ती म्हणून काही रक्कम मुलीच्या बँक खात्यावर जमा करते.
मुलींना त्यांच्या मुलांप्रमाणे आवडीनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आपल्या परिवाराकडून मिळते .
या योजनेमुळे मुलींचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
या योजनेमुळे मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.
सरकार मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत असल्यामुळे कमी वयात होणारे मुलींचे लग्न यांचे प्रमाण कमी झाले आहे.
बालिका समृद्धी योजना पात्रता – Balika Samridhi Yojana Eligibility
अर्ज करणाऱ्या मुलीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.
मुलीचा जन्म हा 15 ऑगस्ट 1997 च्या नंतर झालेला असल्यास त्या मुलीला बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील दोन मुलींना लाभ मिळणार आहे त्यापेक्षा जास्त मुलींना लाभ मिळणार नाही.
अर्ज करणाऱ्या मुलींच्या कुटुंबाचे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असावे.
बालिका समृद्धी योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळणार आहे.
अर्जदार मुलीचे स्वतःचे बँक खाते असावे किंवा तिच्या पालकाचे आणि मुलीचे जॉईंट खाते असावे.
नमो शेतकरी योजनेच्या माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा .
https://yojnavarta.com/नमो-शेतकरी-योजना-2024
बालिका समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे – Balika Samridhi Yojana Documents
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- ज्या वर्गात शिकते त्याचे बोनाफाईड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
बालिका समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा – How To Apply Balika Samridhi Yojana
बालिका समृद्धी योजनेचा अर्ज तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतात.
बालिका समृद्धी योजना ऑफलाईन अर्जपद्धती – Offline Apply
- ग्रामीण भागात अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जावे लागेल. आणि शहरी भागात अर्ज करायचा असेल तर आरोग्य केंद्रात जावे लागेल.
- तेथून तुम्ही बालिका समृद्धी योजनेचा अर्ज घ्या.
- अर्जदाराने अर्जात दिलेली सर्व माहिती वाचावी व अर्ज भरून घ्यावा.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा.
- आता हा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
बालिका समृद्ध योजना ऑनलाईन अर्जपद्धती – Balika Samridhi Yojana Apply Online
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- वेबसाईटवर जाताच तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल .
- यानंतर न्यू रेजिस्ट्रेशन यावर क्लिक करावे आणि मोबाईल नंबर , जिल्हा निवडून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागेल
- अर्जप्रक्रिया करण्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा .
- तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल ,त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती नाव, पत्ता, बँकेचे तपशील, मोबाईल नंबर अचूक भरायची आहे.
- यानंतर तुम्हाला बालिका समृद्धी योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आता सबमिट बटणवर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही Online आणि Offline या दोन्ही पदधतीने बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करणे सरकारने खूप सोपे केले आहे.
निष्कर्ष
अशाप्रकारे मित्रांनो आज आपण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या बालिका समृद्धी योजना विषयी माहिती बघितली आहे. राज्य सरकारच्या योजनेमुळे मुलींना नक्कीच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये फायदा झालेले आपणास दिसून येते.
या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा हा सरकारचा यशस्वी प्रयत्न आहे. या लेखात आपण या योजनेचे फायदे, पात्रता, कागदपत्रे अर्ज कसा करावा हे पाहिले आहे. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर नक्की Comment करून सांगा. आणि या पोस्टला शेअर करा.
आशाचा सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या एकदा वेबसाईटला नक्की भेट द्या आणि लेख वाचा धन्यवाद !
वारंवार विचारले जाणारे प्रश्न ( FAQ )
बालिका समृद्धी योजने साठी कोण पात्र आहे ?
15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर ग्रामीण शहरी भागात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुली या योजनेस पात्र असतील.
बालिका समृद्धी योजना कधी सुरु झाली ?
बालिका समृद्धी योजना 15 ऑगस्ट 1997 ला सुरू करण्यात आली आहे
बालिका समृद्धी योजनेचे लाभ कोणासाठी मर्यादित आहेत ?
बालिका समृद्धी योजनेचे लाभ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबात जन्मलेल्या मुलींपुरतेच मर्यादित आहेत.
बालिका समृद्धी योजनेची पात्रता काय आहे ?
अर्जदार मुलगी राज्याची रहिवासी असावी , मुलीच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असावे